
शहरातील विविध ठिकाणी कोकेन आणि मॅफेड्रोनची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या सहा परदेशी नागरिकांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने उंड्री परिसरातून अटक केले. त्यांच्याकडून 69 लाख रुपये किमतीचे कोकेन आणि मॅफेड्रोन जप्त केले आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे उपस्थित होते.
मनफ्रेंड दाऊद मंडा (वय – 30), अनास्टाझिया डेव्हिड (वय – 26), हसन अली कासिद (वय – 32) बेका हमीस फॉऊमी (वय – 42, सर्व रा. टांझानिया), शामिम नंन्दावूला (वय – 30), पर्सि नाईगा (वय – 25, दोघेही रा. युगांडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 137 ग्रॅम कोकेन, 1 किलो 151 ग्रॅम मॅफेड्रोन, मोबाईल, इलेक्ट्रानिक वजनी काटे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
उंड्रीतील अतुर हिल्स सोसायटीतील रॉ हाउसमध्ये राहणाNया परदेशी नागरिकांकडून चोरून कोकेनसह मॅफेड्रोनची विक्री केली जात असल्याची माहिती अमंली पदार्थविरोधी पथकाचे कर्मचारी मनोज साळुंखे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. तेथून सहाजणांना अटक करून अमंली पदार्थांचा साठा जप्त केला. सहा आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
पुण्यात 8 देशी बनावटीच्या पिस्तूलांसह जिवंत काडतुसांचा शस्त्रसाठा जप्त, चौघांना अटक
अटकेत असलेले आरोपी मागील चार वर्षांपासून शहरात राहत आहेत. आरोपी मेडिकल, स्टुडंट व्हिसावर पुण्यात आले आहेत. त्यांनी हे मेफेड्रोन कुठून आणले, कोणाला विकणार होते याचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे,सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, प्रवीण शिर्के, राहुल जोशी, मारूती पारधी, पांडुरंग पवार, रूबी अब्राहम, मनोज साळुंके, प्रवीण उत्तेकर, विशाल शिंदे, विशाल दळवी, रेहाना शेख, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली आहे.
अंमली पदार्थ शोधण्यासाठी डॉगस्कॉडची घेतली मदत
उंड्रीत राहणाऱ्या परदेशी नागरिकांकडून अंमली पदार्थांची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्परेने सापळा रचला. विशेषतः आरोपींनी लपविलेले अमंली पदार्थ शोधून काढण्यासाठी डॉगस्क्वॉडची मदत घेतली. त्यानंतर आरोपींनी ताब्यात घेतल्यानंतर अंमली पदार्थ शोधून काढण्यासाठी डॉगस्क्वॉडची मदत झाली.
































































