ज्येष्ठ महिलेच्या घरातून रोकड चोरणारा अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरकामास ठेवलेल्या कामगाराने ज्येष्ठ महिलेच्या घरातून 1 लाख 20 हजारांची रोकड चोरणाऱ्या कामगाराला खडकी पोलिसांनी अटक केले. विनीतकुमार बिल्टू साफी (वय – 20, रा. औंध रस्ता, खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिलेचे पती आजारी आहेत. पतीच्या उपचारासाठी त्यांनी 1 लाख 20 हजारांची रोकड कपाटात ठेवली होती. विनीतकुमार साफी त्यांचे घरकाम करतो. महिलेचे लक्ष नसल्यचाी संधी साधून त्याने कपाटातील रोकड लांबविली होती. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात साफीने रोकड चोरल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील तपास करत आहेत.