पुणे – टॅक्सी बुक करतानाच मोबाईल मारला; बंडगार्डन पोलिसात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईलवरून टॅक्सी बुकिंग करताना आणि कामावरून घरी जाणाऱ्या तरुणांचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मागील दोन दिवसांपासून सलग दोन घटनांमुळे नागरिक भीतीखाली वावरत आहेत.

पुणे बसस्थानकाबाहेर टॅक्सीचे मोबाईलवरून बुकिंग करीत असताना चोरट्यांनी देवेंद्र शहा (वय 28) यांच्या हातातील 5 हजारांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी पादचारी तरूणाच्या हातातील 7 हजारांचा फोन हिसकावून पळ काढला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी तपास करीत आहेत.