पुणे – रवींद्र बऱ्हाटेच्या पाच मिळकती जप्त होणार, न्यायदंडधिकाऱ्यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ravi-barhate

बांधकाम व्यवसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी घेणाऱ्या फरार माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या 5 मिळकती जप्त करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आठजणांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे, दीप्ती आहेर, शैलेश जगताप, देवेंद्र जैन, अमोल चव्हाण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुधीर वसंत कर्नाटकी रा. कोथरूड यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फरार माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या मालकीचा लुल्लानगरमधील दोन फ्लॅट, धनकवडीतील मोकळा प्लॉट, तळजाई परिसरातील बंगला, कात्रज परिसरातील भागीदारीतील जमीन अशा 5 मिळकती जप्त करण्यात येणार आहेत.