
लग्नाचे आमिष दाखवून आतेभावानेच एका तरुणीवर वारंवार बलात्कार केला आहे. पीडित तरुणीची प्रसूती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यातही घेतले आहे. वीस वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
आरोपी काही ना काही कारणाने नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत आरोपी पीडितेच्या घरी जात होता. त्यावेळी त्याने पीडित तरुणीशी जवळीक साधून लग्न करण्याच्या आमिषाने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे तरुणी गर्भवती राहिली. काही दिवसांपूर्वी तिने एका बाळाला जन्म दिला. आरोपीने तिला घरच्यांना न सांगण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडितेने कुटुंबीयांपासून हा सर्व प्रकार लपवला होता. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली.


























































