
बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती साधनसामुग्री उपलब्ध न करता निष्काळजीपणा बाळगल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरुन पडून बिगारी महिला ठार झाली. ही घटना तीन दिवसांपुर्वी शिवणेतील स्नेहा हाईट्समध्ये घडली.
दौलवी हुसेन खललदार (वय 35, रा. कर्वेनगर) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी इमारतीचे बिल्डर, सुपरवायझर, ठेकेदारांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणेतील दांगट पाटील इस्टेटमध्ये स्नेहा हाईट्स इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्या बांधकाम साईटवर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे तिसNया मजल्यावर वीटा टाकण्याचे काम सुरु असताना दौलवी यांचा खाली पडल्याने मृत्यू झाला. बांधकाम व्यवसायिक, सुपरवायझर, ठेकेदारांनी निष्काळजीपणा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वारजे पोलीस तपास करीत आहेत.


























































