पुण्यात पादचारी तरूणावर वार करून 25 हजार रुपये लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाला अडवून त्याच्यावर चाकूने वार करत 25 हजार रूपये चोरून नेल्याची घटना 20 डिसेंबरला रात्री साडेनउच्या सुमारास हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली. याप्रकरणी किरण शिंदे (वय 31 रा. ससाणेनगर, हडपसर ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हे 20 डिसेंबरला 25 हजार रूपये घेउन रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी तिघा चोरट्यांनी त्यांच्याजवळ येऊन शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील 25 हजारांची रोकड हिसकावून घेत चाकूने कमरेखाली वार करीत त्यांना जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करीत आहेत.