
सार्वजनिक स्वच्छतागृहात गेलेल्या तरुणाला अडवून दोघांनी दांडक्याने बेदम मारहाण करून लुटल्याची घटना ताडीवाला रस्त्यावरील घडली.
अजय उर्फ हॅलो लक्ष्मण कांबळे (वय 19 रा. ताडीवाला रस्ता) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार पसार झाला आहे. या प्रकरणी आर्यन गायकवाड (वय 18) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आर्यन आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीतील आहेत. 10 जुलैला रात्री साडेआठच्या सुमारास आर्यन मित्रांसोबत चहा पिण्यासाठी राजगुरू चौकात गेला होता. त्यानंतर तो लघुशंका करण्यासाठी स्वच्छतागृहात गेला. त्यावेळी अजय आणि त्याच्या साथीदाराने आर्यनला पकडले.
त्याला दांडक्याने मारहाण करून बेदम मारहाण करीत 660 रूपयांची रोकड चोरून नेली. त्याला वाचविण्यास आलेल्या मित्राला चोरट्यांनी दगड फेकून मारला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड तपास करीत आहेत.






























































