
सामना ऑनलाईन । जकार्ता
रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱया हिंदुस्थानच्या पी. व्ही. सिंधूने शनिवारी बॅडमिंटन कोर्टवर धडाकेबाज कामगिरी करीत ग्रेगोरिया मरीस्का हिला पराभूत केले आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता अंतिम फेरीत या शटलक्वीनसमोर जपानच्या नोझोमी ओकुहरा हिचे आव्हान असणार आहे.
पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरीस्का हिला २३-२१, १६-२१, २१-९ अशा फरकाने पराभूत करीत आगेकूच केले. हिंदुस्थानच्या फुलराणीने हा गेम २३-२१ अशा फरकाने जिंकला. दुसऱया गेममध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूने झोकात पुनरागमन करताना २१-१६ अशी बाजी मारली. पण तिसऱया गेममध्ये पी. व्ही. सिंधूने ग्रेगोरिया मरीस्का हिला २१-९ अशा फरकाने पराभूत करत कूच केली.



























































