राहुल गांधी यांना महिला आयोगाची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजस्थानमधील जयपूरमध्ये एका सभेत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राहुल गांधी गोत्यात आले आहेत. या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने राहुल यांना नोटीस पाठवली आहे.

56 इंचाची छातीवाले चौकीदार (पंतप्रधानांना उद्देशून) पळाले आणि महिलेला, सीतारामनजी यांना सांगितले, माझा बचाव करा… मी माझा बचाव करू शकत नाही, असे वक्तव्य राहुल यांनी बुधवारी जयपूरमध्ये झालेल्या सभेत केले आहे.

राहुल यांचे हे वक्तव्य तमाम स्त्रीवर्गाची निंदा करणारे, अनैतिक आणि न पटणारे आहे. एका महिला मंत्र्याचा अवमान करणारे हे वक्तव्य आहे. यामुळे अशा बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे.