‘मेक इन इंडिया’ नाही तर आता ‘रेप इन इंडिया’ झालंय, राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी झारखंडमधील गोड्डा येथे केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी हिंदुस्थानात सध्या ‘मेक इन इंडिया’ नाही तर ‘रेप इन इंडिया’ सुरू आहे.

‘नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया म्हटले होते. हल्ली देशात फक्त रेप इन इंडिया सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी यांच्या आमदाराने महिलेवर बलात्कार केला. तिचा अपघात घडवला पण नरेंद्र मोदी यांनी त्यावर एक चकार शब्दही काढला नाही. नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ असा नारा दिला आहे. पण त्यांनी मुलींचं कुणापासून रक्षण करा हे मात्र सांगितलं नाही. त्यांनी भाजप आमदारापासूनच मुलींचं रक्षण केलं पाहिजे’, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.