
हॅमलेज, आर्चिससारख्या ब्रॅण्डेड दुकानांत मिळणारी महागडी खेळणी दर्जाहीन असल्याचे उघड झाले असून भारतीय मानक विभागाने देशभरातील या नामांकित पंपनीच्या दुकानांवर धाडी टाकून तब्बल 18 हजार 600 अधिक खेळणी जप्त केली आहेत. गेल्या दोन आठवडय़ांत 44 ठिकाणी धाडी टाकत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
लहान मुलांसाठी खेळणी तयारी करणारी जगातील सर्वात जुनी पंपनी अशी हॅमलेजची ओळख आहे. भारतीय मानक विभागाच्या मापदंडात न बसणारी तसेच भारतीय मानक विभागाची मोहोर नसलेली खेळणी जप्त करण्यात आली आहेत. भारतीय मानक विभागाने खेळण्यांच्या दर्जासाठी मापदंड तयार केले असून त्यांचे पालन करणे 1 जानेवारी 2021 पासून सक्तीचे आहे. खेळणी निर्माते आणि विव्रेते यांच्याकडून या मानकांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय मानक विभागाकडे येत होत्या. या तक्रारींची दखल घेत ही कारवाई केल्याचे विभागाचे संचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी स्पष्ट केले.
ई–कॉमर्स पंपन्यांनाही नोटीस
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने तीन बडय़ा ई–कॉमर्स कंपन्यांनाही नोटीस बजावली आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलचा यात समावेश आहे. निकृष्ट दर्जाची खेळणी विकल्याबद्दल या कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. हॅमलेज, आर्चिजसोबतच डल्ब्यूएच स्मिथ, किड्स झोन आणि कोकोकार्ट या दुकानांवरदेखील छापे टाकण्यात आले. 28 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 यादरम्यान ही कारवाई करण्यात आली. या पंपन्यांची दुकाने अनेक मॉल्स आणि विमानतळांवर आहेत. या विव्रेत्यांविरोधात आता पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
























































