
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे महाडचे मिंधे आमदार ‘भरत गोगावले’ यांनी माफी मागावी अन्यथा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम उधळून जाऊ असा इशारा शिवसैनिकांनी दिला होता.
शिवसैनिकांच्या इशाऱ्यानंतर सरकारची तंतरली आणि त्यांनी पोलिसांमार्फत महाड विधानसभा क्षेत्रातील शंभरहून अधिक शिवसैनिकांना एक वर्ष आंदोलन करता येणार नाही अशा नोटीसा बजावल्या.
शिवसैनिकांकडून 107 कलमान्वये बॉण्ड लिहून घेतला आणि एक वर्ष ऐवजी एक महिना आंदोलन करता येणार नाही असे गुरुवारी लिहून घेतले.
आज पहाटे तीन ते साडेतीन च्या दरम्यान पोलीस महाड विधानसभेतील प्रत्येक शिवसैनिकाच्या घरी धडकले आणि त्यांना कोणतीही कल्पना देता नवी कलमे लावून त्यांची धरपकड केली. या सर्वांना पोलिसांच्या मोठ्या पाच व्हॅनमध्ये कोंबून अलिबागला नेले जात आहे.
शिवसैनिक कार्यक्रमस्थळी आले तर याद राखा असा दम भरत गोगावले यांनी रायगडच्या पोलीस अधीक्षकांना दिल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी शिवसैनिकांची धरपकड केली आहे रायगड पोलीस भरत गोगावले यांचे मिंधे आहेत. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची तात्काळ बदली करा अशी मागणी महाड – शिरगावचे सरपंच आणि कडवट शिवसैनिक सोमनाथ ओझर्डे यांनी केली.


























































