रेल्वेने दोन दिवसांत विशाखापट्टणम गाठले, ऑक्सिजन एक्प्रेसवर रेल्वेचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशाखापट्टणम येथून ऑक्सिजनचे टँकर घेऊन महाराष्ट्रात दाखल झालेल्या देशातील पहिल्या ऑक्सिजन ट्रेनने काल नागपूर येथे तीन टँकर उतरविले तर आज सकाळी नाशिकमध्ये चार टँकर उतरविण्यात आले आहे. कळंबोली ते विशाखापट्टणम हे अंतर तब्बल 1850 कि.मी.हून अधिक असून ते या ट्रेनने 50 तासात पूर्ण केले. रस्ते मार्गे हे अंतर कापण्यासाठी तीन दिवस लागले असते परंतु रेल्वे मार्गे दोन दिवस विशाखापट्टणमला जाण्यास लागले.

विशाखापट्टणम येथून ऑक्सिजनचे सात टँकर भरून निघालेली रेल्वेची पहिली ऑक्सिजन एक्प्रेस काल रात्री 8 वा. नागपूर स्थानकात दाखल झाली. सोमवार 19 एप्रिलच्या रात्री कळंबोली येथून ही एक्प्रेस विशाखापट्टणम येथे रवाना झाली होती. ऑक्सिजनची वाहतूक रेल्वे गाडय़ांद्वारे रस्ते मार्गापेक्षा जलद होते.

रेल्वेने वाहतुकीस 2 दिवस तर रस्तेमार्गे 3 दिवस लागतात. रेल्वेगाडय़ा 24 तास धावू शकतात परंतु ट्रक चालकांना विश्रांती थांबा इ. घेण्याची गरज असते. रेल्वेने या टँकरच्या वेगवान वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता.