
रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) ने ग्रुप डी भरती परीक्षा 2025 चे शेडय़ुल जारी केले आहे. ही परीक्षा 17 नोव्हेंबरला सुरू होणार असून डिसेंबरच्या अखेरपर्यंत चालणार आहे. या भरतीअंतर्गत एकूण 32,438 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये विविध तांत्रिक आणि सहायक पदांसाठी भरती केली जाणार आहे. ही परीक्षा कॉम्प्युटरआधारित टेस्ट (सीबीटी) द्वारे घेतली जाईल.