
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
रेल्वेच्या ऑनलाइन तिकिटावर रेल्वेत मिळणाऱया पदार्थांच्या किमतीही यापुढे दिसणार आहेत. प्रवासादरम्यान रेल्वेकडून विक्री होणाऱ्या खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे प्रवाशांकडून उकळण्यात येतात. प्रवाशांच्या लुबाडणुकीला लगाम घालण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
रेल्वेत मिळणाऱ्या पदार्थांची मूळ किंमत आणि रेल्वेतील कामगारांकडून त्या पदार्थांची होणारी विक्री यामध्ये तफावत आढळून आली आहे. रेल्वेच्या कॅटरिंग सुविधे- विषयी प्रवाशांना फारशी माहिती नसते. त्यामुळे प्रवाशांची निव्वळ फसवणूक होते. ही फसवणूक थांबविण्यासाठी रेल्वेने ऑनलाइन तिकिटावर सर्व खाण्यापिण्याच्या पदार्थांचे रेटकार्ड उपलब्ध करून दिले आहे.
रेल्वेतील ‘मेन्यू’कार्ड
- टी बॅगसोबत चहा, कॉफी – ७ रुपये
- पाण्याची सीलबंद बाटली – १५ रुपये (१ लीटर), १० रुपये (अर्धा लीटर)
- जनता थाळी – २० रुपये
नाश्ता
- शाकाहारी – ब्रेडबटर, कटलेट – ३० रुपये,इडली-वडा – ३० रुपये
- मांसाहारी – ऑमलेट – ३५ रुपये
जेवण(लंच/डिनर)
- शाकाहारी – भात, पराठा/चपाती, डाळ/सांभार, भाजी, लोणचे, पाणी – ५० रुपये
- मांसाहारी – भात, पराठा/चपाती, डाळ/सांभार, अंडाकरी, लोणचे, पाणी – ५० रुपये
























































