साईनगर शिर्डी ते दहार का बालाजीदरम्यान रेल्वे 20 उन्हाळी विशेष गाड्या चालवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून साईनगर शिर्डी आणि दहार का बालाजी दरम्यान 20 साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक 09740 साप्ताहिक सुपरफास्ट समर स्पेशल 14 एप्रिलपासून ते 26 जूनपर्यंत दर रविवारी साईनगर शिर्डी येथून 07.25 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 08.10 वाजता दहार का बालाजी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 09739 साप्ताहिक सुपरफास्ट समर स्पेशल डहर का बालाजी येथून दर शुक्रवारी 22 एप्रिलपासून ते 24 जूनपर्यंत 21.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 20.30 वाजता साईनगर शिर्डीला पोहोचेल.

या गाडीला कोपरगाव, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, भोपाळ, शुजालपूर, उज्जैन, नागदा, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा आणि जयपूर हे थांबे असतील. गाडीत दोन एसी 2 टियर, फोर एसी-3 टियर, 8 स्लीपर क्लास आणि 4 जनरल सेकंड क्लास आणि 2 जनरल सेकंड क्लास कम ब्रेक व्हॅन असतील.

पूर्णपणे आरक्षित विशेष ट्रेनसाठी बुकिंग क्र . 09740 विशेष शुल्कावर 20.4.2022 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा, असे आवाहन करण्यात आले आहे.