सेलू तालुक्यातील हिस्सी येथे गारांचा पाऊस, वीजेच्या कडकडाटासह वादळी वारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी जिल्ह्याचा पारा ४३ अशांवर गेलेला असताना आज गुरुवारी सकाळी ६ वाजेपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पारा ४०.७ अशांवर आला आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हिस्सी या गावी गारांचा पाऊस बरसला.

गेल्या आठवडभरापासून जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली होती. उष्णतेची लाट मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आल्याने नागरिक हैराण झाले होते. या उष्णतेच्या लाटेपासून ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ७ च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू लागले.