लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, चार जनावरे ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर शहरासह जिल्ह्याला आज अवकाळी पावसाने झोडपले. जोरदार वारे विजांचा कडकडाट आणि अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. औसा तालुक्यात वीज पडून चार जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यातील काही भागात गारांचा पाऊस देखील पडला. पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.

औसा तालुक्यातील भेटा येथील अल्पभुधारक शेतकरी गोरोबा विश्वनाथ हजारे यांच्या दोन गाई वीज पडून मरण पावल्या आहेत तर हिप्परगा (कवळी) येथील दादासाहेब साहेबराव पाटील यांची एक म्हैस मरण पावली आहे.किल्लारी पासून जवळच असलेल्या मौजे पारधेवाडी ता. औसा येथील शेतकरी व्यंकट बळिराम साखरे यांच्या बैलाचा वीज पडून मुत्यू झाला.

लातूर शहरासह, औसा, लातूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर, चाकूर, निलंगा, जळकोट, रेणापूर, उदगीर या तालुक्यात वादळी वारे, वीजांचा कडकडाट व अवकाळी पाऊस झाला. वीज पुरवठा बंद झाला होता.