
सोलापूर शहर व जिह्यात गेल्या तीन दिवसांपासून पवसाची रिपरिप सुरू आहे. दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही, तर आज दिवसभरात 22 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सोलापूर शहर व परिसरात महिनाभरापासून पावसाने ओढ दिली होती. गुरुवारी रात्रीपासून पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाला सुरुवात झाली आहे. काही काळ जोराचा पाऊस, तर काही काळ रिमझिम पाऊस पडत असल्याने लोकांची तारांबळ उडत आहे. सखल भागांत पाणी साचले असून, रस्त्यातील खड्डय़ांमुळे सर्वत्र चिखल झाल्याचे चित्र आहे. शनिवारी दिवसभरात 22 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.


























































