राज कुंद्राने त्याच्या नावावरील संपत्ती शिल्पा शेट्टीच्या नावावर केली

पॉर्न फिल्म्स प्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा राज कुंद्रा याने त्याच्या नावावरील काही संपत्ती पत्नीच्या नावावर केली आहे. राजने त्याच्या नावावरील पाच फ्लॅट शिल्पाच्या नावावर केले असून त्याची बाजारभावानुसार किंमत अंदाजे 38 लाख रुपये आहे.

राज कुंद्रा याने 24 जानेवारी 2022 रोजी हा व्यवहार झाला असून त्यासाठी राज कुंद्राने तब्बल 1.92 कोटींची स्टँप ड्युटी भरली आहे. या संपत्तीमध्ये जुहूमधील ओशियन इमारतीतील एक आलिशान फ्लॅट देखील आहे.

अश्लील चित्रपट तयार करून त्याचे वेगवेगळ्या ऍपच्या सहाय्याने प्रसारण केल्याच्या आरोपाखाली 19 जुलै रोजी गुन्हे शाखेने राज कुंद्रासह तिघांना अटक केली होती. राज कुंद्रा याला सप्टेंबर महिन्यात जामिन मिळाला होता. मुंबई क्राईम ब्रांचने पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राविरोधात दीड हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले असून त्यात राज कुंद्राची पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीची साक्ष नोंदवण्यात आली आहे.