
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत. माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी पक्षाच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क कमिटीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसला चांगलाच झटका बसला आहे. दर्डा यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. लोकसभेतील दारूण पराभवानंतर काँग्रेसने राज्यातील नेतृत्वात बदल करत बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतरही पक्षाच्या संघटनात्मक स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. गेली कित्येक वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असणाऱया दर्डा कुटुंबातील सदस्याने निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.





























































