
राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला होणाऱया निवडणुकीतील दोन अर्ज छाननीनंतर बाद झाले. त्यामुळे आता सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.अक्षय सानप व शामराव कदम या दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. दोघांच्याही उमेदवारी अर्जावर आमदारांच्या सह्या नव्हत्या. आता शिवसेना नेते संजय राऊत व संजय पवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक (भाजप), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी) आणि इम्रान प्रतापगढी (काँग्रेस) असे सहा उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज 3 जूनपर्यंत मागे घेता येतील.
अश्विनी वैष्णव भाजपचे निरीक्षक
दरम्यान, भाजपने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी पक्ष निरीक्षक म्हणून नेमले आहे. ते लवकरच मुंबईत येणार आहेत.



























































