वंचित आघाडी ही ‘किंचित’ आघाडी, आठवलेंची आंबेडकरांवर बोचरी टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या 11 एप्रिलला पार पडणार आहे. यापूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील महत्त्वाचा पक्ष रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बहुजन भारिप महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर येथील उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या बोचरी टीका केली आहे.

वंचित आघाडी ही किंचित आघाडी असल्याचे विधान आठवले यांनी केले आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्षाला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत करावी, त्याशिवाय ते निवडून येऊ शकत नाही, तसेच त्यांना मंत्रिपदही मिळेल, असे आठवेल म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

पवार, राहुल यांच्यावर टीका
यावेळी आठवले यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा समाचार घेतला. मोदींच्या विकासाची हवा असून बारामतीत पवारांचा किल्ला ढासळणार असा दावा त्यांनी केला. तसेच राफेल प्रकरणी राहुल गांधींनी देशातील नागरिकांना गाफिल ठेऊ नये, मोदी हे फकीर आहे, तसे राहुल गांधी कधी होऊ शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.