अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ, केंद्रीय मंत्री आठवले यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळे विद्यापीठ असावे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरीयाल यांची भेट घेऊन आठवले यांनी ही मागणी केली आहे.


एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आठवले म्हणाले की, “रमेश पोखरियाल हे माझे चांगले मित्र आहेत. बुधवारी मी त्यांना भेटून अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे विद्यापीठ असावे अशी मागणी केली आहे.’’ मध्य प्रदेशमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाथी ज्या प्रमाणे विद्यापीठ स्थापन केले आहे त्याच धर्तीवर हे विद्यापीठ असावे असेही आठवले यांनी पोखरीयाल यांना सांगितले आहे. तसेच खाजगी विद्यापीठातही अनुसुचित जातींच्या विद्यार्थ्यांना आरक्षण असावे अशीही मागणी आठवले यांनी केली आहे.