
सामना प्रतिनिधी, लातूर
तालुक्यातील मौजे निवळी येथे दोन गटात हाणामारीची घटना घडली. दोन्ही गटांकडून दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही गटातील 20 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
अभयकुमार राजाराम सोनपेठकर रा.निवळी ता.लातूर यांनी मुरुड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, गावातील चुलत भावाचे व गावातील मुलांची किरकोळ तक्रार झालेली होती. ते भांडण फिर्यादीने मिटवले आणि त्याच्या पिठाच्या गिरणीत येऊन गिरणी सुरू केली. त्यावेळी गावातील मारुती उर्फ दादा लिंबराज शिंदे, लक्ष्मण माणिक शिंदे, मुकिंदा माणिक शिंदे, महेश मुकिंदा शिंदे, मंगेश मुकिंदा शिंदे, गोरोबा शिवाजी शिंदे, बाबासाहेब माणिक शिंदे, पांडूरंग नरसींग शिंदे, असाराम नरसींग शिंदे, महेश रमेश शिंदे सर्वजण रा. निवळी हे पिठाच्या गिरणीत आले. फिर्यादीस शिवीगाळ केली. हातोड्याने दादासाहेब शिंदे याने फिर्यादीस मारले, असाराम शिंदे याने चेनने मारहाण केली. गिरणीतील मीटरजवळील केबलला आग लावली. फिर्यादीची आई भांडण सोडवण्यास आली असता लक्ष्मण शिंदे, महेश शिंदे यांनी दगडाने, लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादीची काकी पुनबाई सोनपेठकर, जिनामती सोनपेठकर यांनाही मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाण करताना मोबाईलवर शुटींग करणाऱ्या विकास शिंदे यासही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान मारुती लिंबराज शिंदे यांनीही तक्रार दाखल केली आहे. मागील तक्रारीच्या कारणावरुन अभय राजाराम सोनपेठकर, विकास भगीरथ शिंदे, सचिन भगीरथ शिंदे, जितेंद्र राजाराम सोनपेठकर, ऋषिकेश राजाराम सोनपेठकर, नितीन अशोक सोनपेठकर, विमलनाथ अदिनाथ सोनपेठकर, विकास अदिनाथ सोनपेठकर, बाळासाहेब शिवाजी सोनपेठकर, सचिन कालीदास सोनपेठकर यांनी फिर्यादीच्या वेल्डींगच्या दुकानात घुसून लोखंडी पाईप, लोखंडी गज, रॉडने फिर्यादीस मारहाण केली. भांडण सोडवण्यास आलेल्या फिर्यादीच्या चुलत्यासही मारहाण केली. आसाराम नरसींग शिंदे यांनाही मारहाण केली. वेल्डींगचे दुकान जाळून टाकले. जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

























































