‘चल फूट इकडून…’ कंगनाची बहीण हृतिक रोशनवर भडकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. त्यात आता कंगनाच्या बहिणीने देखील रोशन कुटुंबीयांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सुपर 30 चित्रपटाच्यानिमित्ताने झालेल्या मुलाखतीत हृतिकने नाव घेता रनौत भगिनींवर टीका केली. त्यामुळे कंगनाची बहीण रंगोली चंदेलने त्याला ‘चल फूट इथून’ असे म्हटले आहे.

रंगोली चंदेलने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिलं आहे की, ‘हे पहा काका पुन्हा सुरू झाले. अरे चल बाबा पुढे हो. वाटतं की, यांना अधूनमधून स्वत:चा अपमान करून घेण्याचं व्यसनच लागलं असावं. तुझ्यासाठी माझ्याकडे कोणताही डोस नाही. चलफूट इकडून ‘

हृतिक काय म्हणाला होता?

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीवेळी कंगनावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर हृतिकने तिचं नाव न घेता टीका केली होती. मला आता लक्षात आले आहे की बुली करणाऱ्यांसमोर संयम जपणं अधिक आवश्यक आहे. याकडे कसे पहायचे हे आपल्या समाजावर निर्भर करते. मी जर कायदेशीर उत्तर दिले तर मला आक्रमक म्हणतील आणि मागे हटलो तर दुर्बळ मनाचा असे म्हणतील. अखेर यांच्यामुळे विचलीत व्हायचे नाही, असे मी शिकलो आहे, असे हृतिक म्हणाला. तसेच जे लोक खरं काय ते जाणून न घेता त्यांना पाठिंबा देतात त्यांच्या मला राग येतो. कारण त्यांच्यामुळे गेली सहा वर्ष ही सर्कस सुरू आहे, असे ही हृतिक या मुलाखतीत म्हणाला.