
अष्टविनायक आराखडयाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, पुरातत्व विभागामार्फत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिर, येथे सुरू असलेल्या जतन व दुरुस्ती कामांमुळे सदर मंदिर 15 एप्रिल 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री महागणपती यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व इतर धार्मिक विधी नियमानुसार सुरू राहणार आहेत. मात्र, भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. तसेच बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी व विश्वस्त यांच्याशिवाय इतर कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.



























































