रत्नागिरी जिल्ह्यात 806 वनराई बंधारे पूर्ण

500

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 806 बंधारे बांधून झाले असून त्यामध्ये 138 वनराई, 287 विजय बंधारे आणि 381 कच्च्या बंधार्‍यांचा समावेश आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पावसाचे पाणी अडवण्यासाठी दरवर्षी लोकसहभागातून बंधारे बांधले जातात. ग्रामपंचायत स्तरावर लक्ष्य निश्चित करुन बंधार्‍यांची मोहिम हाती घेतली जाते. यंदा जिल्ह्यात सरासरी 5 हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस सुरुच होता. त्यामुळे यंदा बंधारे बांधण्याची मोहिम सुरु होण्यास विलंब झाला. सर्वच तालुक्यांमध्ये वनराई, विजय आणि कच्चे बंधारे बांधण्याचे काम सुरु झाले असून दापोली तालुका बंधारे बांधण्याच्या मोहिमेत आघाडीवर आहे. मंडणगड तालुक्यामध्ये 10 वनराई आणि 49 कच्चे बंधारे असे एकूण 59 बंधारे बांधण्यात आले आहेत. दापोली तालुक्यात 21 वनराई, 179 विजय बंधारे आणि 61 कच्चे बंधारे बांधण्यात आले आहेत. खेड तालुक्यात केवळ 17 कच्चे बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 12 वनराई, 15 विजय आणि 103 कच्चे बंधारे असे एकूण 130 बंधार्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. गुहागर तालुक्यात 15 वनराई, 46 विजय आणि 7 कच्चे असे एकूण 68 बंधारे, संगमेश्वर तालुक्यात 13 वनराई, 11 विजय आणि 89 कच्चे असे एकूण 113 बंधारे, रत्नागिरी तालुक्यात 16 वनराई, 7 कच्चे असे एकूण 23 बंधारे, लांजा तालुक्यात 24 वनराई, 26 विजय आणि 29 कच्चे असे एकूण 79 बंधारे, राजापूर तालुक्यात 27 वनराई, 10 विजय आणि 19 कच्चे असे एकूण 56 बंधारे बांधण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या