एका रात्रीत स्टार झालेली रानू मंडल पुन्हा विपन्नावस्थेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील राणाघाट रेल्वे स्थानकावर गाणे म्हणून भीक मागणारी रानू मंडल सोशल मीडियामुळे एका रात्रीत स्टार झाली होती. पण संगीतकार हिमेश रेशमियाने बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी दिलेल्या रानूचे दिवस सहा महिने काम नसल्याने पुन्हा फिरले आहेत. कारण ‘तेरी मेरी कहानी’या हिट ठरलेल्या गाण्यानंतर रानूला पुढे कामच मिळाले नाही.

या ‘रातोकी रानी’ ठरलेली रानू आता उदरनिर्वाहासाठी काम शोधात असल्याचे उघड झाले आहे. कोरोनामुळे स्थानिक संगीताचे कार्यक्रम बंदच झाल्याने रानूचा पैसे कमवण्याचा तोही मार्ग बंद झाल्याने ती मोठय़ा आर्थिक संकटात सापडली आहे.