
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
राज्यमंत्री अर्जुन खोतकर व माझ्यात वैयक्तीक संघर्ष नव्हता. आणिबाणीची झळ कोणाला बसली त्यांना कॉम्पेसेशन देण्यात येईल. माझे शस्त्र मी खाली ठेवले. संघर्ष होतच असतो, पण धोका दिला नाही. अगोदर मी फॉर्म भरणार आहे. जालना जिल्हयात शिवसेना-भाजप युती अभेद्य आहे. आघाडी सरकारच्या काळातही जिल्हयातील सहकारी बँक, जिल्हा परिषद 30 वर्ष युतीच्या ताब्यात होती. मी देखील परिक्षेत शंभर पैकी शंभर गुण मिळवून पास होईल. आमच्यात मतभेद होत मनभेद कधीच नव्हते. खोतकरांना सोबत घेऊन युतीचा गड कायम ठेवला जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे म्हणाले.
जालन्याचा तिढा सुटला, युतीचा धर्म पाळणार
याआधी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत युतीचा धर्म पाळण्याचे ठरले. त्यानंतर शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एकमेकांना पेढा भरवून युतीधर्म पाळणार असल्याचे जाहीर केले.



























































