घरकाम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

घरकाम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर घर मालकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको परिसरातील दत्तनगर येथील ब्रिजमोहन जयस्वाल यांच्या घरी पिडीत १६ वर्षीय मुलगी मागील अनेक दिवसांपासून घरातील धुणे-भांडी करण्यासाठी कामाला होती. घरी कुणी नसल्याचे संधी साधत जवळपास सहा महिन्याभरापूर्वी ब्रिजमोहन जयस्वाल यांनी सदरील मुलीवर बलात्कार करुन ही घटना कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. काही दिवसापूर्वी या मुलीचा कुंकवाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बलात्काराची ही घटना उघडकीस आली.

या प्रकरणी आरोपी ब्रिजमोहन जयस्वाल यांच्या विरोधात पोस्को व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी ब्रिजमोहन जयस्वाल फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे हे करीत आहेत.