लतादीदींच्या जाण्यानं बाळासाहेबांनंतरचा मोठा आघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लतादीदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुखदुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱया दीदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी व दै. ‘सामना’च्या संपादक सौ. रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बाळासाहेब असताना आणि नंतरदेखील लतादीदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दीदींचा पह्न नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगांत आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱया दीदी आज आपल्यात नाहीत, माझी त्यांना भावपूर्ण आदरांजली, असे सौ. रश्मी ठाकरे यांनी म्हटले आहे.