गोवा बनावटीची 4 लाख 65 हजार रुपयांची दारु जप्त, उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करणा-या क्रेटा गाडीचा पाठलाग करून सुमारे 4 लाख 65 हजार 120 रुपयांचे गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 81 बॉक्स आणि वाहनासह 16 लाख 65 हजार 120 रुपयांचा मुददेमाल उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे.

नाताळ व 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरुन गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे हे पथक संगमेश्वर एसटी स्टॅण्ड समोरील गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर थांबून वाहनांची तपासणी करत असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गोव्याच्या दिशेकडून येणान्या राखाडी रंगाच्या चारचाकी मोटार कारला थांबण्याच्या इशारा केला असता पथकाला चुकवून वाहनचालक भरधाव वेगाने रिव्हर्स गिअर टाकून तेथून वाहनासह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना या संशयीत वाहनाला भरारी पथकाच्या शासकीय वाहनाने अडवून ठेवून जागीच पकडले.

संशयित वाहनातील वाहनचालकाने आपल्या ताब्यातील क्रेटा गाडीतून पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाठलाग करून संशयीत आरोपी इसमांना पकडण्यात आले. वाहनचालकाच्या ताब्यातील वाहन क्र.एम.एच. 07 ए.एस.7301 या गाडीमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रॅण्डचे एकूण 4 लाख 65 हजार 120 रुपये किंमतीचे 81 बॉक्स आणि वाहनासह 16 लाख 65 हजार 120 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. या गुन्हातील संशयीत आरोपी ओंकार इंद्रजीत सावंत व सहआरोपी वैभव मनोज कांबळी यांच्याविरुध्द्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर व रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संजय दळवी, दुय्यम निरिक्षक सचिन यादव, शैलेश कदम, जवान वैभव सोनावले, महिला जवान सुजल घुडे, जवान आणि वाहनचालक मलिक धोत्रे यांनी केली, या गुन्ह्याचा पुढील तपास निरिक्षक संजय दळवी, राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीचे भरारी पथक करत आहे.