
अनेकदा जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा वस्तूंच्या किंमती 99, 99, 799 किंवा 499 रुपये इतके असतात. एक रुपया कमी करून विक्रेत्याला काय फायदा होत असेल असा प्रश्न आपल्यालाही पडत असेल. पण या मागे विक्रेत्यांची एक स्ट्रॅटेजी असते. जास्तीत जास्त ग्राहकांसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा किंमती ठेवल्या जातात.
ग्राहकांची मानसिकता
अमेरिकेतील हार्डमन विद्यापीठातील प्राध्यापक ली हिबेट यांनी याबाबत विश्लेषण केले आहे. ही एक सायकोलॉजिकल मार्केट स्ट्रॅटेजी असते. बहुतांश ग्राहकांना शॉपिंग करताना सूट हवी असते. एखाद्या वस्तूवर 499 रुपये किंमत असेल तर शक्यतो आपण उजवीकडून डावीकडील संख्या वाचतो. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची किंमत 19 हजार 999 इतकी असेल तर आपण पटकन त्या वस्तूची किंमत 19 हजार इतकी असेल असे समजतो. उर्वरित 999 कडे आपले दुर्लक्ष होते. तसेच 499 रुपये जर किंमत असेल तर त्याची किंमत 500 रुपये ग्राह्य धरतील. असेही काही ग्राहक असतात ते या वस्तूची किंमत 400 रुपये ग्राह्य धरतील. विक्रेते अशाच ग्राहकांची वाट पहात असतात.
विक्रेत्याचा मोठा फायदा
सध्या ऑनलाईन शॉपिंग आणि ऑनलाईन पेमेंटचे खूप सारे पर्याय आहे. असे असले तरी आजही अनेक लोक रोख रक्कम देऊन वस्तू विकत घेतात. वस्तूची किंमत एक रुपये कमी असल्याने कोणी एक रुपया परत मागत नाही. विक्रेता कधी कधी त्या एक रुपया ऐवजी काही चॉकलेट किंवा टॉफी ग्राहकाच्या हाती देतो. अनेकवेळेला ग्राहक हे पैसेही परत मागत नाही. अशा प्रकारे एक एक रुपये म्हणून विक्रेत्याकडे मोठी रक्कम जमा होते. उदाहरणार्थ आपल्या शहरांत 150 दुकाने असतील. त्या दुकानात सरासरी 100 ग्राहकांनी एक रुपया परत केला नाही तर, 150X100X365= 54 लाख 75 हजार. म्हणजेच या ग्राहकांनी आपल्य खिशातून 54 लाखहून अधिक रक्कम विक्रेत्याला अशीच दिली. ही रक्कम हिशोबात कुठेच दिसत नाही म्हणून त्यावर कुठलाही कर लागत नाही.
































































