क्षुल्लक कारणावरून हॉटेल मालकाची दोन जवानांना जबर मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये एका हॉटेल कर्मचार्‍याने दोन हंदुस्थानी सैन्याच्या जवानांना जबर मारहाण केली आहे. एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या वादात हॉटेलच्या कर्मचार्‍याने दोन्ही जवानांना लाठ्या काठ्याने मारहाण केली आहे.

रविवारी दोन जवान एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. तेव्हा हॉटेलमधील एका कर्मचार्‍यांशी त्यांचा वाद झाला. नंतर हॉटेल कर्मचार्‍याने रागाच्या भरात दोघांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या प्रकरणी 7-8 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केली आहे. तरी हा वाद नेमक्या कुठल्या कारणावरून झाला हे समजू शकले नाही.