हुश्श! सोमवारी बसू… बार, रेस्टॉरंटस् उघडणार!

hotels
फाईल फोटो

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. अर्थव्यवस्थेला चालना देतानाच मागील सहा महिन्यांपासून शटर डाऊन असलेल्या हॉटेल्स, फूडकोर्ट, रेस्टॉरंट आणि बारना 5 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे करताना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन कराके लागणार असले तरी या निर्णयाने त्यामुळे हॉटेल उद्योगाला नकसंजीकनी मिळाली आहे. त्याचप्रमाणे राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरू करण्यास तत्काळ परवानगी देतानाच पुण्यातील लोकल सेवाही सुरू करण्यास महाविकास आघाडीने हिरवा कंदील दाखवला आहे.

– मुंबई महानगर प्रदेशातील सर्व इंडस्ट्रियल आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिटही सुरू करण्यास परवानगी.
– रूग्णांना लागणारी ऑक्सिजनची आवश्यकता पाहता सर्व ऑक्सिजन पुरवठा करणाऱया वाहनांना कोणत्याही आडकाठी शिवाय चोवीस तास वाहतुकीची परवानगी. ऑक्सीजन निर्माते व पुरवठादार यांच्यावरही कोणतेही निर्बंध टाकण्यात येणार नाहीत.

डबेवाल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना लोकल ट्रेनने प्रवासाची टप्प्याटप्प्याने मुभा देण्यात आली. यामुळे लोकल ट्रेनमधील प्रवाशांची संख्या काढली आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचेही काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी मुंबई महानगर परिसरातील लोकल ट्रेन वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे डबेवाल्यांनाही रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली असून त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयाकडून क्यूआर कोड घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी हॉटेल व्यावसायिकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर राज्यातील रेस्टॉरंटस् सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज अनलॉक 5 जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि फूडकोर्ट सुरू होणार असून यासंदर्भात पर्यटन विभागाकडून स्वतंत्र मार्गदर्शक तत्वेही जारी करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यांतर्गत रस्ते वाहतुकीची मुभा दिल्यानंतर आता राज्यांतर्गत रेल्वे सेवाही सुरू करण्यात आली आहे.

हे बंदच राहणार
राज्यातील शाळा, कॉलेज मात्र बंदच राहणार आहेत. सिनेमागृह, स्किमिंग पूल, थिएटरप्रमाणेच मेट्रो रेल्वेदेखील बंदच राहणार आहे.

केंद्र सरकारच्या सूचना… 15 ऑक्टोबरपासून थिएटर्स, मल्टिप्लेक्स, स्विमिंग पूल सुरू
केंद्र सरकारनेही आज अनलॉक 5 अंतर्गत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार 15 ऑक्टोबरपासून सिनेमा थिएटर्स, मल्टिप्लेक्स, स्विमिंग पूल, एक्झिबिशन हॉल आणि मनोरंजन उद्याने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र संबंधित ठिकाणच्या एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच प्रवेश देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. 15 तारखेपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असली तरी हा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारांवर सोडण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या