रिक्षा चालकांचा पूर्व द्रुतगती मार्गावर रास्ता रोको ; मीटर रि-कॅलिब्रेशनमध्ये गोंधळ

टॅक्सी आणि रिक्षाची भाडेवाढ करण्यात आल्यानंतर त्यानंतर मीटरमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी आरटीओकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी पूर्व द्रुतगती महामार्ग, घाटकोपर-विक्रोळी परिसरात रास्ता रोको केला. 1 मार्चपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडय़ात वाढ करण्यात आली आहे.

मात्र, त्यासंबंधी मीटरमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी 31 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी पूर्व नोंदणी न करताच आलेल्या शेकडो रिक्षा चालकांमुळे विक्रोळी-घाटकोपर सर्व्हिस मार्गावर शुक्रवारी मोठा गोंधळ उडाला. नोंदणी केली नसल्याने रि-कॅलिब्रेशन होणार नसल्याचे कळताच संतप्त रिक्षा चालकांनी काही काळासाठी रास्ता रोको केला.

आपली प्रतिक्रिया द्या