पायाला सूज, कुबड्यांचा आधार… अपघातानंतर प्रथमच समोर आला ऋषभ पंतचा फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा विकेटकिपर ऋषभ पंत याचा डिसेंबर महिन्यात दिल्ली डेहराडून महामर्गावर अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झालेला. या अपघाताच्या तब्बल दोन महिन्यानंतर ऋषभचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत त्याच्या उजव्या पायाला सूज दिसत असून तो कुबड्यांच्या आधारे चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

पंतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत.”एक पाऊस पुढे, एक पाऊल मजबूत, एक पाऊस सर्वोत्म दिशेने” अशी कॅप्शन त्याने या फोटोंसोबत शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा पाऊस पडला असून त्याच्या चाहत्यांनी त्याला पुन्हा मैदानात लवकरात लवकर बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.