
नाशिकहून कांदे आणणाऱ्या ट्रक चालकाला बोलबच्चनगिरी करून हजारो रुपयांचा चूना लावणारा भामटा सटकला. पण पंतनगर पोलिसांनी शिताफिने माघ काढत त्या आरोपीला पवईच्या फिल्टर पाड्यातून अटक करत ट्रक चालकाचे पैसे परत मिळवून दिले.
कार्तिक (नाव बदलेले) हा चालक नाशिकहून कांद्याचा ट्रक घेऊन मुंबईत येतो. गुरुवारी तो पंतनगर येथील रेल्वे पोलीस वसातहतीत असताना आरोपी अर्जुन वाघमोडेने त्याच्याशी संपर्क साधला. मला नाशिकला गृहपयोगी वस्तू नाशिकला घेऊन जायचे आहे असे त्याने चालकाला सांगितले. ठरल्यानुसार कार्तिक घटनास्थळी आल्यावर अर्जुनने त्याला बोलबच्चनगिरी करायला सुरुवात केली. पैसे माझ्या बँक खात्यावर आहेत. आता 10 हजार दे मग नाशिकला गेल्यावर तुझे भाडे आणि 10 हजार दोन्ही देतो असे म्हणाला. माणुसकी दाखवत कार्तिकने त्याला 10 हजार रुपये दिले. पैसे मिळाताच अर्जुनने तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच कार्तिकने पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक राहुल वाघमारे, अमंदार कोळपे, साटेलकर, कोकाटे, आहेर, रोकडे या पथकाने आरोपीचा शोध सुरू करत त्याला फिल्टर पाडा येथे अटक केली.



























































