अनिकेत तटकरे यांची उमेदवारी ही अजितदादा गटाची राजकीय तडजोड, रोहित पवार यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध होता. त्यांना विधान परिषद निवडणुकीत मिळालेली उमेदवारी ही अजितदादा गटाने केलेल्या राजकीय तडजोडीतून मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

कोकणातील शिंदे गटातील अनेक नेते यापूर्वी सुनील तटकरे यांच्यावर टीका करत होते. तटकरे पक्षाला अडचणीत आणतात, असे म्हणत होते. मात्र आता त्यांचा विरोध अचानक शांत झाला आहे. या ठिकाणी पालकमंत्रीपद किंवा अन्य राजकीय समीकरणांवर तडजोड झाली असावी. त्यामुळेच अनिकेत तटकरेंना रायगडमधून उमेदवारी मिळाल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांनी इतर पक्षांमध्ये लक्ष घालण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे, असे म्हटले आहे.

पक्षापेक्षा कुटुंबाचा अधिक विचार

तुम्ही जिथे चुकणार, तिथे आम्ही बोलणारच. तुम्ही म्हणता खूप कष्ट घेतले, पण खरोखरच कष्ट घेतले असते तर कोकणात घडय़ाळाची वाताहात झाली नसती. तुम्ही कोकणात लक्ष घातल्यापासून पक्षापेक्षा स्वतःच्या कुटुंबाचा अधिक विचार केला. त्यामुळेच पक्षाचे मोठे नुकसान झाले, असा टोला रोहित पवार यांनी तटकरे यांना लगावला आहे.