रोहितला झालंय तरी काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या पाच सामन्यांत 2, 3, 0, 0, 7 अशा निराशाजनक खेळय़ा करणाऱया ‘हिटमॅन’ म्हणून लौकिक असलेल्या रोहित शर्माला नक्की झालंय तरी काय असा प्रश्न सर्वांना पडलाय. त्याचं वाढत चाललेलं वजन आणि कमी होत असलेल्या धावांच्या भुकेमुळे सारेच चिंतेत पडलेत.

रोहितचं अपयश मुंबईच्या विजयानंतरही आता प्रकर्षाने जाणवू लागलेय. आतापर्यंत तो सर्वच्या सर्वच्या 11 सामने खेळलाय आणि त्याच्या बॅटमधून केवळ 191 धावा निघाल्या आहेत. धावांची सरासरी आहे 17.36 ची आणि स्ट्राइक रेट आहे 124.83 चा. इतक्या अपयशी खेळीनंतर रोहितच्या फलंदाजीबाबत नाराजीचा सूर निघू लागला आहे. ना धावा होत आहेत ना नेतृत्वात चमक दिसतेय आणि क्षेत्ररक्षण पाहिल्यावर का खेळतोय, असे प्रश्न उभे राहताहेत.

मंगळवारी बंगळुरूचा पराभव केल्यामुळे मुंबईने आठव्यावरून थेट तिसऱया क्रमांकावर गरुडझेप घेतली, पण या कामगिरीत रोहितची कामगिरी शून्य आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये रोहितला 16 कोटींचा भाव मिळाला होता. म्हणजे त्याच्या एका धावेसाठी 8 लाखांपेक्षा अधिक रुपये मोजले गेलेत. हे सारे पाहून क्रिकेटप्रेमीच रोहितला सल्ला देऊ लागलेत की त्याने आता नॉन प्लेइंग काप्टन (न खेळणारा कर्णधार) म्हणून खेळावे. कारण रोहितची फलंदाजी पाहता त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणूनही खेळवू शकत नाही.

सर्वात अपयशी कर्णधार–फलंदाज

रोहित यंदा सर्वात अपयशी फलंदाज-कर्णधार ठरला आहे. रोहितची सरासरी सर्वात वाईट आहे. अष्टपैलू हार्दिक पंडय़ानेही (277) रोहितपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. डय़ु प्लेसिस (576) सर्वात पुढे आहे. त्याच्या पाठोपाठ धवन (349), वॉर्नर (330), नितीश राणा (326), सॅमसन (308), हार्दिक पंडय़ा (277), राहुल (274) आणि मार्करमचा (179) क्रमांक लागतो.

रोहितसाठी धोक्याची घंटा

रोहितची आयपीएलमधील कामगिरी त्याच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे. पुढील सामन्यात रोहितच्या कामगिरीला धावांची साथ नाही लाभली तर आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याच्यावर खूप मोठा दबाव निर्माण होईल, जे हिंद्स्थानी संघासाठी फार धोकादायक ठरू शकते. तसेच आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने यंदा आयपीएलमध्ये शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैसवालसारखे सलामीवीर म्हणून नावारूपाला आले आहेत. रोहितचे अपयश त्यांच्यासाठी हिंदुस्थानच्या वन डे संघात स्थान देण्यात उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे रोहितसमोर आपल्या ‘हिटमॅन’ला साजेसा खेळ दाखविण्याची वेळ आलीय. ही वेळ त्याने साधली नाही तर त्याची वेळ निघून जायला फार वेळ लागणार नाही.

आयपीएल गुणतालिका

संघ सा. वि.   प. ने. र.    गुण

गुजरात  11    8  3    0.951   16        चेन्नई     12  7    4 0.493 15

मुंबई   11 6    5  -0.255  12

लखनौ 11 5    5  0.294   11

राजस्थान  11  5  6    0.388   10

कोलकाता 11  5  6    -0.079  10

बंगळुरू   11    5  6    -0.345  10

पंजाब 11 5    6  -0.441  10

हैदराबाद  10  4  6    -0.472  8

दिल्ली 11 4    7  -0.605  8

टीप ः सा-सामना, वि-विजय, प-पराजय,ऩे र.- नेट रनरेट

ही आकडेवारी चेन्नई – दिल्लीपर्यंतची आहे.

 

अव्वल फलंदाज

फलंदाज सा. धावा     सरासरी 4    6

डय़ुप्लेसिस   11  576      57.60   45  32

जैस्वाल  11 477 43.36   62  21

शुभमन   11 469 46.90   49  13

कॉन्वे 11     468 57.25   54  13

कोहली   11 420 42.00   39  11

 

अव्वल गोलंदाज

गोलंदाज  सा. वि.     सरासरी 4 वि.    5 वि.

शमी 11 19 16.36     1    0

राशीद 11   19    18.73   0    0

देशपांडे 12    19      21.78   0    0

चावला  11 17    18.88   0    0

वरुण  11   17    19.23   1    0