
सामना ऑनलाईन । लखनौ
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या बॅटमधून मंगळवारी धावांचा पाऊस पडला. त्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांचे फटाके उडाले. मुंबईच्या पठ्ठय़ाने ट्वेण्टी-20तील विक्रमी चौथे शतक (नाबाद 111 धावा) झळकवतानाच हिंदुस्थानसाठी या प्रकारात सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रमही केला.
रोहित शर्माच्या झंझावाती फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडीजचा 71 धावांनी धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. रोहित शर्माचीच ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. टीम इंडियाकडून मिळालेल्या 196 धावांचा पाठलाग करणाऱया वेस्ट इंडीजला 124 धावांपर्यंतच मजल मारता आली.
- रोहित शर्मा व शिखर धवन (43) या सलामीवीरांनी 123 धावांची दमदार भागीदारी केली.
- रोहित शर्माने 61 चेंडूंत सात गगनभेदी षटकार व आठ चौकारांसह नाबाद 111 धावा फटकावल्या.




























































