आरटीई प्रवेश निश्चितीसाठी आता शेवटची संधी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरटीई शाळा प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने आता अंतिम मुदत जाहीर केली आहे. पहिल्या निवड फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची तपासणी आणि प्रवेश निश्चितीसाठी 22 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही मुदत अंतिम असून या वाढीव मुदतीच्या कालावधीतील दाखले ग्राह्य धरण्यात येणार आहेत. राज्यातील खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशाच्या एकूण 1 लाख 1 हजार 846 जागा असून या जागांवर प्रवेशासाठी तब्बल 3 लाख 64 हजार 413 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यांपैकी 94 हजार 700 विद्यार्थ्यांची पहिल्या प्रवेश फेरीत निवड करण्यात आली. प्रवेश घेण्यासाठी वारंवार मुदत वाढवूनदेखील आतापर्यंत 58 हजार 978 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. अद्याप सुमारे 35 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाहीत. या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चिती करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. 22 मेनंतर ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.