आरोग्य सेतु ऍप कोणी बनवले माहितच नाही, माहिती आयोगाची अनेक विभागांना नोटीस

कोरोना केसेसच्या कोन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी  केंद्र सरकारने आरोग्य सेतु ऍप बवनले होते. आरोग्य सेतुच्या ऍपच्या वेबसाईटवर नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरचे नाव आहे. परंतु हे ऍप कोणी बनवले हे नॅशनल इन्फॉर्मेटिक माहितच नाही, तसेच त्यांच्या वेबसाईटवर याबाबत कुठलीच माहित नाही.

आरोग्य सेतु ऍप कोणी बनवले  केंद्र सरकारला एका माहिती अधिकारात  प्रश्न विचारण्यात आला होता.  यावर अर्जदाराला योग्य ती माहिती मिळालीच नाही. आता माहिती आयोगाने या प्रकरणी मुख्य माहिती अधिकारी, राष्ट्रीय इ गव्हर्नन्स विभाग, माहिती आणि तंत्रज्ञान विभाग आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरला कारणे दाखवा नोटिस दाखवली आहे. नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरला माहिती आयोगाने धारेवर धरले आहे. जर आरोग्य सेतु ऍप नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरने बनवले असेल तर त्याची माहिती वेबसाईटवर का नाही असा प्रश्न माहिती आयोगाने विचारला आहे.

कोरोना काळात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतु ऍप बनवले होते. सर्व नागरिकांसाठी हे ऍप इन्स्टॉल करणे अनिवार्य केले होते. या ऍपवरून व्यक्तीच्या खासगी माहितीवर गदा येईल अशी शंका व्यक्त करण्यात आली होती आणि त्यामुळे वादही निर्माण झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या