उडत्या विमानात प्रवाशाने कापले ‘केबिन क्रू’ चे बोट; पायलटने घेतला महत्त्वाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उडत्या विमानात प्रवाशांचा गैरवर्तुवणीच्या अनेक घटना घडतात. मात्र, एका प्रवाशाने असे कृत्य केले की, पायलटला विमानाचे आपत्कालीन लँडिग करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या प्रवाशाच्या गैरवर्तवणुकीमुळे आणि पायलटने घेतलेल्या इमरज्न्सी लँडिंगच्या निर्णयामुळे इतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.

या प्रवाशाने आधी विमानातील कर्मचाऱ्यांशी विनाकारण वाद घातला. त्यानंतर त्याला समजवण्यासाठी आलेल्या केबिन क्रूचे त्याने रागाच्या भरात बोटच कापले. या घटनेने विमनात एकच घबराट पसरली. टर्किश एअरलाइन्सच्या विमानात ही घटना घडली आहे. डेली स्टारने याबाबतचे वृत्त दिले आहे. या प्रवाशाने अंमली पदार्थाचे सेवन केल्याची माहिती मिळाली आहे.

टर्किश एअरलाइन्सचे विमान इस्तांबूलहून इंडोनेशियाची राजधानी जकार्ताकडे जात होता. त्यावेळी यातील एका प्रवाशाचा विमानातील कर्मचाऱ्यांशी वाद सुरू झाला. त्यांच्यातील वाद हाणामारीपर्यंत पोहचला. त्यामुळे या वादात मध्यस्थी करण्यासाठी केबिन क्रू आला. वादात मध्यस्थी करण्यासाठी केबिन क्रू आल्याने प्रवाशाचा राग आणखी वाढला. त्याने केबिन क्रूला ठोसे लगावण्यास सुरुवात केली. तरीही केबिन क्रू त्याला आवरण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे चवताळलेल्या प्रवाशाने केबिन क्रूचे बोटच कापले.

या घटनेने विमानात एकच गोंधळ उडाला. इतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अखेर कर्मचाऱ्यांनी काही प्रवाशांच्या मदतीने चवताळलेल्या प्रवाशाला नियंत्रणात आणले. विमानातील या गोंधळाची माहिती पायलटला मिळताच त्याने कुआलानामु विमानतळावर विमानाचे इमरजन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

विमानाचे सुखरुप लँडिंग झाल्यानंतर विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशाला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्या प्रवाशाचे नाव मुहम्मद जॉन जॅज बॉडविजन असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला विमानातून उतरवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याने अंमली पदार्थाचे सेवन केल्याची माहिती मिळाली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.