
गेल्या काही महिन्यांपासून ज्या प्रकारे परदेशी गुंतवणूकदार (FII) हिंदुस्थानातील शेअर बाजारातून पैसे काढून घेत आहेत आणि गुंतवणूक टाळत आहेत. आता परदेश गुंतवणूकदारांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी आरबीआयने मोठी घोषणा केली आहे. भारतीय बॉण्ड्सवर परदेशी गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या व्याजावरील २०% कर पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर रचना जागतिक बाजारांशी सुसंगत करणे हा यामागील उद्देश आहे. ही अर्थव्यवस्थेसाठीही एक चांगली बातमी आहे. या निर्णयामुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया सावरला आहे.
रुपया मजबूत करणे आणि परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या मंजुरीने, आरबीआयने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना (FIIs) सरकारी रोख्यांमधील (G-Secs) गुंतवणुकीवर भांडवली नफा करातून (capital gains tax) सूट जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा घोषणेची चर्चा होती.
परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बॉन्ड्सवर मिळणाऱ्या व्याजावर आकारला जाणारा २०% कर पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेच्या धर्तीवर कर रचना तयार करणे हा यामागील उद्देश आहे, जेणेकरून परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) भारतीय कर्ज बाजारात मुक्तपणे गुंतवणूक करू शकतील.
एफआयआयंशी संबंधित या घोषणेमुळे शुक्रवारी रुपयामध्ये अमेरिकी डॉलरच्या तुलनेत अचानक मोठी वाढ दिसून आली. सरकारच्या या निर्णयानंतर, सुरुवातीच्या व्यवहारात रुपया ५० पैशांनी मजबूत होऊन ९५.२४ वर पोहोचला. तथापि, दुपारी १ वाजता तो ९५.३७ वर व्यवहार करत होता. या कर सवलतीमुळे भारतीय कर्ज बाजारात परकीय भांडवलाचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.




























































