टीम इंडियाची गोलंदाजी समतोल आणि परिपूर्ण! सचिन तेंडुलकर

47
फोटो - बीसीसीआय

सामना ऑनलाईन, साऊदम्पटन

टीम इंडियाची वेगवान आणि फिरकी गोलंदाजी या युगातला सर्वात परिपूर्ण व समतोल माराच ठरेल. यंदाच्या टीम इंडियाची गोलंदाजांत जसप्रीत बुमराहसारखा डेथ ओव्हर्समध्ये धोकादायक ठरणारा गोलंदाज आहे. शिवाय त्याच्या साथीला मंद खेळट्टय़ांवरही बदलत्या वातावरणात चेंडू स्विंग करू शकणारा भुवनेश्वर कुमार आणि भन्नाट वेगाने फलंदाजांची त्रेधातिरपीट उडवू शकणारा मोहम्मद शमी आहे. या त्रिकुटाच्या साथीला प्रतिस्पर्धी फलंदाजांना फिरकीच्या भुलभुलैयात अडकवू शकणारी ‘रिस्ट स्पिनर’ युझवेन्द्र चहल आणि ‘चायनामन’ चेंडू टाकण्यात माहीर कुलदीप यादव आहे. इंग्लंडच्या वातावरणात हिंदुस्थानी मारा प्रभावी ठरेल, असे स्तुती करणारे उद्गार मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने काढले.

 

आपली प्रतिक्रिया द्या