सिंधुदुर्गात गुरुवारी ‘सागर कवच’ अभियान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र तटीय परिसरामध्ये व तालुक्यांमध्ये गुरुवारी ( 27 एप्रिल) सकाळी 6.00 वाजेपासून ते शुक्रवार ( 28 एप्रिल) सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत ‘सागर कवच’ अभियान राबविण्यात येणार आहे. या सदर सागर कवच अभियानाच्या वेळी रेड टीम समुद्र मार्गाने किंवा महामार्गाने घुसखोरी करणार आहे. ही घुसखोरी रोखण्यासाठी त्यांना ओळखून जागेवरच ताब्यात घेण्याची कारवाई सर्व मच्छीमार, सागर सुरक्षा दलाचे सदस्य, सागर सुरक्षा वार्डन व इतर नागरिक यांनी दक्षता घ्यावयाची आहे.

या सागर कवच अभियानादरम्यान समुद्रात जाणाऱ्या सर्व बोटीवरील कागदपत्रे अद्ययावत असणे व तपासणीसाठी हजर ठेवणे आवश्यक आहे. सागर कवच अभियानाच्या वेळी चेकपोस्टवर सर्व वाहने तपासणी करण्यासाठी थांबविण्यात येतील. सागर कवच अभियाना अंतर्गत आपण सागर,सागरी किनारी सतर्क आहोत हे सर्वांनी अभियानामध्ये सहभागी होऊन यशस्वी करायचे आहे, असे आवाहन देवगड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.