6 जानेवारीला संभाजीराव भिडे गुरुजी श्रीरामपुरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी हे 6 जानेवारीला श्रीरामपूर येथे येत आहे. श्रीराजगड ते श्रीरायगड गडकोट मोहीम व रायगडावरील शिवरायांच्या सुवर्ण सिंहासनाची पुनर्स्थापना या विषयावर व्याख्यान श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान श्रीरामपूर विभागाकडून आयोजित करण्यात आले आहे.

27 जानेवारी ते 30 जानेवारी श्रीराजगड ते श्रीरायगड गडकोट मोहीम आयोजित करण्यात आली आहे. आपल्या देशातील तरुण हे श्री शिवाजी-श्री संभाजी रक्त गटाचे व्हावे यासाठी या मोहीम आयोजित केल्या जातात. याच मोहिमांचे महत्व सांगण्यासाठी भिडे गुरुजी श्रीरामपूर मध्ये येत आहेत. रायगडावरील शिवरायांच्या सुवर्ण सिंहासनाच्या पुन्हा संस्थापनेचे महत्वही भिडे गुरुजी उपस्थितांना सांगणार आहेत. स्थळ आणि वेळ लवकरच कळवण्यात येईल.